संगमनेरातील काठे मळ्यात गुरुवारी खंडोबा- म्हाळसा राणी विवाह सोहळा       

0

संगमनेर : मल्हारी मार्तंड खंडोबा भक्त होलम राजा काठीचे मानकरी काटकर तुकाराम काठे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील दिल्ली नाक्या जवळील काठे मळ्यात दि.५ जानेवारी रोजी खंडोबा म्हाळसा राणी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

          मल्हारी मार्तंड खंडोबा भक्त तुकाराम काठे महाराज , शिव मल्हारी मार्तंड खंडोबा भक्त मंडळ, संगमनेर तालुका वाघ्या मुरळी परिषद त्यांच्या वतीने दरवर्षी काठे मळ्यामध्ये खंडोबा म्हाळसा राणी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी गुरुवारी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त  सामुदायिक जागरण गोंधळ कार्यक्रम होणार आहे.गुरुवारी सायंकाळी हा सोहळा होणार आहे. सायंकाळी पाच वाजता खंडोबाची सवाद्य मिरवणुक ,६ वाजता हळद, ७  वाजता शुभविवाह ७.३० वाजता महाआरती, प्रसाद व नंतर  रात्रभर सामुदायिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. खंडोबा भक्तांनी सहकुटुंब या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक तुकाराम महाराज काठे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here