संजीवनी फार्मसी महाविद्यालय व टीसीएस मध्ये सामंजस्य करार

0

उद्योग व रोजगारभिमुख मनुष्यबळ निर्मितीसाठी अधिकचे प्रयत्न
कोपरगांव: Sanjeevani College of Pharmacy संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड  रिसर्च (फार्मसी महाविद्यालय) व टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) TCS यांच्यात अलिकडेच परस्पर सामंजस्य करार (एमओयु) झाला. विध्यार्थ्यांमध्ये उद्योगभिमुखता व रोजगारभिमुखता वाढीसाठी या कराराचा उपयोग होणार असुन या करारामुळे संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने अधिकचे कीर्तिमान स्थापित केले असल्याची माहिती फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

कराराचे दस्तावेज परस्परांमध्ये हस्तांतरीत करते वेळी टीसीएसच्या अकॅडमिक इंटरफेस प्रोग्रामचे ग्लोबल हेड डॉ. के. एम. सुसेंद्रन, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, टीसीएस टॅलेंट अक्विझीशन ग्रुपच्या पुणे विभागाच्या प्रमुख श्रीमती लता कारकी, पुणे विभागाचे अकॅडमिक इंटरफेस प्रोग्रामचे प्रमुख ऋषिकेश  धांडे, संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे संचालक डॉ. विपुल पटेल, संजीवनीचे कार्पोरेट रिलेशन्स प्रमुख ईम्राण शेख, फार्मसी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा निलेश पेंडभाजे उपस्थित होते.
टीसीएस ही जागतिक दर्जाची कंपनी असुन संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने या कंपनीशी  सामंजस्य करार करून एक क्रांतिकारी पावुल टाकले आहे. यापुर्वीही या महाविद्यालयाने विनाअनुदानित वर्गवारीमध्ये देशात ९ व्या स्थानी तर महाराष्ट्रात १ ल्या स्थानी स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे. 

तसेच या महाविद्यालयाने नॅशनल इन्स्टिट्यूशनल  रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) नुसार रॅन्क बॅन्ड ७६-१०० मध्ये आपले स्थान सिध्द केलेले असुन अटल रॅन्क पुरस्कार देखिल प्राप्त केलेला आहे. एनआयआरएफ ही भारतातील उच्च शिक्षणाच्या संस्थांना क्रमवारी लावण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण  मंत्रालयाने अवलंबलेली रॅकिंग पध्दत आहे. या सर्व उपलब्धींमुळे टीसीएस बरोबर करार करण्यास सोपे झाले.
आता टीसीएस कंपनीशी सामंजस्य  करार केल्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फार्मासिस्ट तयार होवुन त्यांना चांगल्या उद्योगाच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी या उपलब्धीचे स्वागत केले असुन सर्वांचे अभिनंदन केले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here