संजीवनीच्या सहा प्राद्यापकांना नव्याने डॉक्टरेट पदवी

0

संजीवनी मधिल संशोधनात्मक सुविधांमुळे पी.एचडी होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने  वाढ
कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स Sanjeevani Group of Institutes संचलित इंजिनिअरींग कॉलेज, पॉलीटेक्निक व संजीवनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधिल एकुण सहा प्राद्यापकांनी विविध संशोधनात्मक प्रबंध सादर करून डॉक्टरेट (पी.एचडी) ही बहुमानाची पदवी प्राप्त केली आणि आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर संशोधनात्मक कार्य सिध्द केले. संजीवनीच्या विविध संस्थांच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये संशोधन कार्यास पुरक असे संशोधन केंद्र असल्यामुळे पी.एचडी होणाऱ्यांच्या  संख्येत झपाट्याने  वाढ होत आहे, असे संजीवनीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे (इसीई)  डॉ. देविदास लोखंडे यांनी ‘क्रॉस एन्ट्री बेस्ड सॉफ्ट हॅन्डओव्हर ऑफ सीडीएमए इन व्हायरल मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्क’ या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी मिळविली. तर याच विभागातील डॉ. मुझफ्फरअली सय्यद यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ वेदिक मॅथेमॅटीक्स बेस्ड मल्टीप्लायर सर्किट’ या विषशयावर प्रबंध सादर केला आणि पी.एचडी पदवी प्राप्त केली. डॉ. लोखंडे व डॉ. सय्यद या दोघांनाही संजीवनीच्या इसीई विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. आगरकर यांनी मार्गदर्शन  केले. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाती डॉ. चेतन बावनकर यांनी ‘डिटेक्शन अँड प्रिव्हेंशन ऑफ बोटनेट अटॅक्स इन इंटरनेट ऑफ थिंग्ज युझिंग ब्लॉक चैन’ या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांना ओरीएन्टल युनिव्हर्सिटी, इंदोरच्या डॉ. संजीव कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील डॉ. अमोल वाबळे यांनी ‘सरफेस मॉडीफिकेशन ऑफ अल्युमिनिअम अलॉयज  युझिंग फ्रिक्शन  स्टीर प्रोसेस’ या विषयावर प्रबंध सादर केला व पुणे येथिल सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने तो ग्राह्य धरत त्यांना पी.एचडी ही पदवी बहाल केली. त्यांना याच विद्यापीठातील डॉ. एस.बी. पाटील यांचे मार्गदर्शन  लाभले.

संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या Sanjeevani K.B.P. Polytechnic मेकॅट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रविण खटकाळे यांनी ‘इफेक्टिव्हनेस ऑफ झेर्निके मुव्हमेंटस् अँड पार्शियल  फिचर्स ऑन रॉबस्ट इरिस रिकग्निशन’ या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांना जेजेटी युनिव्हर्सिटी, राजस्थानचे डॉ. अलोक अग्रवाल व संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे अकॅडमिक डीन डॉ. अनिल पवार यांनी मार्गदर्शन  केले. संजीवनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे (एसआयएमएस) डॉ. किरण शिंदे यांनी ‘रूरल डेव्हलपमेंट थ्रू  अॅग्रीप्रनरशिप : ए स्टडी ऑफ मॉडेल व्हिलेजेस हिवरेबाजार अँड  राळेगणसिध्दी ऑफ अहमदनगर डिस्ट्रीक्ट’ या विषयावर प्रबंध सादर करून पी.एचडी ही मानाची पदवी मिळविली. त्यांना एसआयएमएसचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर यांनी मार्गदर्शन  केले.
             संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे Sanjeevani Group of Institutes अध्यक्ष नितिनदादा कोल्हे Nitin Dada Kolhe यांनी सर्व नवोदित पी.एचडी धारकांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्वांचा छोटेखानी सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देवुन नव्याने केलेल्या संशोधनाचा विध्यार्थ्यांना फायदा करून द्यावा अशी  अपेक्षा व्यक्त केली. यावेळी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, एसआयएमएसचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर, पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख डॉ. बी.एस. आगरकर, डॉ. अनिल पवार, डॉ. माधुरी जावळे व डॉ. प्रसाद पटारे उपस्थित होते.विश्वस्त सुमित कोल्हे यांनीही सर्वांचे अभिनंदन केले.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here