देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
नाशिक येथून प्रस्थान ठेवलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे रविवार दिनांक ३०जून रोजी देवळाली शहरात आगमन होणार असून या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपालिका प्रशासन भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिलेच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.लाखो भाविकांचा समावेश असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी दरवर्षी दुपरचया वेळी देवळाली प्रवरा शहरातून राहुरीकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होत असते. भाविकांची पाणी, आरोग्य व इतर सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासन नेहमीच सज्ज असते. मुख्याधिकारी विकास नावाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी देवळाली प्रवरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पालिका प्रशासन काळजी घेत आहे.
यावेळी आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ यांच्या नियोजनातून आरोग्य विभाग कर्मचारी व सर्व इतर विभागांचे कर्मचारी सोबत घेऊन शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
याकामी संभाजी वाळके, भारत साळुंके, तुषार सुपेकर, भूषण नवाल, दिनकर पवार, उदय इंगळे, अभिषेक सुतावणे सर्व विभागप्रमुख यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच यावेळी सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
देवळाली प्रवरा शहरवासीय वारकरी सेवेसाठी सज्ज
संत निवृत्तीनाथ दिंडीतील भाविकांना चहा, नाश्ता, भोजन आदि व्यवस्था रविवारी देवळाली प्रवरा शहरात केली जाणार आहे.चव्हाण वस्ती येथे पालखीचे स्वागत होऊन त्या ठिकाणी प्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे. साई मंदिर येथे आमटी भाकर पंगत दिली जाणार असून भाविकांनी सकाळी भाकरी चपाती जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. बाजार तळ तसेच इतर ठिकाणी भोजन, नाश्ता, चहा-पान व्यवस्था करण्यात आली आहे.