प्राथमिक शाळां प्रमाणे सर्व शाळा शासकीय शाळा करण्याचा आमचा मानस
कोपरगाव ( वार्ताहर) :नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्य मिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नाशिक, येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्ष ते खाली शिक्षण संस्था चालक महामंडळ नाशिक, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ , व सर्व संघटनांचे प्रतिनिधी यांच्या सोबत शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रश्न समजावुन घेणे व ते तातडीने सोडवणे या साठी विभागीय मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी. उपसंचालक मा. बी . बी . चव्हान, सचिव मच्छिन्द्र कदम , उपरीक्षणधिकारी उदय देवरे , प्रकाश आहिरे .सुधिर पगार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने .मंत्री विजय नवल पाटील , नितीन ठाकरे, पंढरीनाथ थोरे संदीप गुळवे यांनी शिक्षक भरती, वेतनेत्तर अनुदान , पवित्र पोर्टल , शिक्षकेत्तर भरती, आर .टी . ई प्रवेश या समस्या मांडल्या तर मुख्याध्यापक संघाच्या वतीने सचिव एस. बी . देशमुख, एस .के सावंत, डॉ. संजय शिंदे,के .के . आहिरे , साहेबराव कुटे, भरत भामरे, डॉ. अनिल माळी ,संजय देसले यांनी प्रश्न मांडले . 133 कोटीची फरक* *बीले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक – शिक्षक रजा रोखीकरणाची बीले , संच मान्यता, नाशिक जिल्ह्यात १००० शिक्षक व ४oo शिक्षकेत्तर पदे रिक्त, आदर्श शिक्षक पुरस्कार , विद्यार्थी गुणवत्तेवर चर्चा ,जुनी पेन्शन योजना, पुर्णवेळ ग्रंथपाल व लॅब असिस्टंट पदे इत्यादी विषय मांडले यावर उत्तर देताना मा . दीपक केसरकर यांनी उत्तर दिले सर्व अनुदानित शाळा शासकीय करून जिल्हा* *परिषदेच्या शाळा प्रमाणे विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य व अनुदान देणार आहोत मात्र संस्थेचे अधिकार अबाधीत ठेवणार आहोत, भरती पवित्र पोर्टल नुसारच होणार पण संस्थेला चॉईस देणार १० /१ त्या साठी सर्वांनी रोस्टर तपासणी करावी . भरती प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरु करणार, खाली प्राथ.के .जी साठीही काही शिक्षक घेणार , वेतनेत्तर अनुदानात वाढ करणार . स्काऊट गाईडला बळकटी देणार मुलांच्या मनात हा संस्कार रुजावा, नविन शैक्षणिक धोरणाची केन्द्राप्रमाणे अंमल बजावणी करणार . पारंपारिक शिक्षणापेक्षा व्यावसायीक व आवडी नुसार शिक्षणाची सुविधा देणार .या* *साठी आर्थिक तरतुद म्हणुन अर्थ खात्याची परवानगी घ्यावी लागते . कोणताही शिक्षक तासिका बेसिक , पार्ट टाइम आपणास ठेवायचा नाही . सर्व शाळांना सोलर सिस्टिम बसवणार त्यासाठी अनुदानही देवु या घोषणा केल्या या वेळी कोंडाजी मामा आव्हाड, आण्णा पाटील , बी . डी गांगुर्डे .एस. ए . पाटील , राजेन्द्र निकम, संग्राम करंजकर ,संजय चव्हान, बी .के . नागरे, आर .टी . जाधव, भागीनाथ घोटेकर, टी एम डोंगरे, आरुण पवार , मोहन चकोर, टी एम घोडके, मनोज वाकचरे ,बाळा साहेब ढोबळे, शिरसाट उपस्थित होते .