अकोले – प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा सभेचे मार्गदर्शन उद्योजक नंदलालजी मणियार (अ.नगर) यांना महेश भूषण पुरस्काराने तर पतीच्या निधनाचे दुःख असतांना देखील श्रद्धा प्लास्टीक या उद्योगाची यशस्वीरित्या कारभार सांभाळणार्या यशस्वी उद्योजीका श्रीमती रूपालीजी गग्गड (संगमनेर) यांना जालना येथे होणार्या बिझनेस एक्स्पो मध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अनिष मणियार यांनी दिली.
येथील हॉटेल रविराज मध्ये अहमदनगर जिल्हा सभेच्या कार्यसमिती बैठकी प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिष मणियार, जिल्हा मंत्री अजय जाजू, सह मंत्री विजय दरक, अर्थमंत्री अनिल भट्टड व जिल्हा कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
त्याप्रसंगी मणियार यांनी माहिती दिली की अहमदनगर जिल्हा सभेद्वारे विविध सामाजिक कार्य यशस्वीरित्या केले जात असुन, विशेष कार्य करणार्या मान्यवरांना सन्मानित करता यावे हा देखील आमचा प्रयत्न असतो. म्हणून ज्या मान्यवरांची माहिती प्रदेशला पाठविली. त्यावर त्यांच्या फॅक्टरी ला प्रदेशाध्यक्ष श्रीकिसनजी भन्साळी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा सभेने पाठविलेले नामांकन योग्य असल्याचे देखील भन्साळी यांनी सांगितले. व त्यानुसार दि. 20 जानेवारी 2020 रोजी या दोन्ही मान्यवरांना जालना येथे होणार्या राजस्तरीय बिझनेस एक्स्पो च्या उद्घाटन समारंभात सन्मानित केले जाणार आहे. या सन्मान सोहळ्यासाठी जिल्ह्यातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाही जिल्हा सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
या दोन्ही मान्यवरांचा सत्कार महासभा सभापती श्यामसुंदर सोनी यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी ह. भ. प. रामराव ढोक महाराज, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, महासभेचे उपसभापती अशोक बंग, संयुक्त मंत्री सुरेंद्र मानधने, माजी आमदार सुरेश जेथलिया तसेच उद्योजक राजेश सोनी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
नंदलाल मणियार हे विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत असुन, यशस्वी उद्योजक देखील आहेत. तालुका सभा पासुन महासभा पर्यंत विविध पदांवर कार्य करतांना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला असुन ते जिल्हा सभेचे ज्येष्ठ मार्गदर्शक असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिष मणियार यांनी सांगितले.
तर जिल्हा मंत्री अजय जाजू म्हणाले कि श्रीमती गग्गड यांच्या पतीचे आकस्मात निधन झाले. परंतु त्यांनी आपल्या उद्योगाचा व्याप बराच वाढविलेला होता. ते असताना देखील श्रीमती गग्गड त्यांना मदत करतच होत्या. परंतु आकस्मात त्यांचेवर कोसळलेल्या दुःखाने खचुन न जाता मोठ्या धैर्याने कौंटुबिक जबाबदारी सह व्यवसायाचा व्याप देखील सांभाळला. यानिमीत्ताने श्रीमती गग्गड यांचा विशेष सन्मान करण्याचा निर्णय प्रदेश सभेने घेतला आहे. या सन्मानाने जिल्हा सभेची मान उंचावली आहे. श्री. मणियार व श्रीमती गग्गड यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.