सहकार दिंडीचे कोपरगावात आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत

0

कोळपेवाडी वार्ताहर -शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते कोपरगाव मार्गावरून येणाऱ्या कै.वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे कोपरगाव शहरांमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले.यावेळी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दिंडी आली असता आ.आशुतोष काळे यांनी सहकार दिंडीचे स्वागत करून स्वत: दिंडीत सहभागी झाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की,सहकाराने समाजाचा विकास साधणे हा एक दीर्घकालिक आणि शाश्वत उपाय आहे. सहकाराची मूलभूत तत्त्वे म्हणजेच समता, सहकार्य, आणि परस्परावलंबन. हे तत्त्व सर्वांगीण समाजाचा विकास साधण्यास मदत करतात, विशेषतः गरीब, दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरीकांसाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून समाजाच्या विविध स्तरांवर विकास साधता येवू शकतो व सर्व स्तरावर सुख-समृद्धी येवू शकते हे सहकाराच्या माध्यमातून सिद्ध झाले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.महाराष्ट्र शासन सहकार विभाग असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन्स, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने रविवार (दि.९) रोजी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या माध्यमातून सहकार चळवळीचा प्रचार व प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश या सहकार दिंडीचा असून दिंडी सोबत देश विदेशातून आलेले सहकार प्रतिनिधी,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here