कोपरगांव (वार्ताहर) दि. ३१ डिसेंबर २०२२
येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा शाखेतील केन अकौंटंट हौशिराम पुंजाजी गोर्डे ३२ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल मुख्य लेखाधिकारी एस.एन. पवार यांनी सत्कार केला. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदी उपस्थित होते. हौशिराम गोर्डे यांचे सुपुत्र निलेश गोर्डे यांची फ्रान्स येथील कंपनीत निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
प्रारंभी उपमुख्य लेखाधिकारी प्रविण टेमगर यांनी प्रास्तविक केले. मुख्यलेखाधिकारी एस.एन. पवार याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातून परिसराचा कायापालट घडवून आणला. बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अभ्यासू नेतृत्व विवेक कोल्हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या नावलौकीकात भर घालून यशस्वीपणे उपपदार्थाबरोबरच औषधी प्रकल्प उभारणीत मोलाचा सहभाग देत आहे. गीता मनुष्याला जीवनात चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण देत असते.
सत्कारास उत्तर देतांना केन अकौंटंट हौशीराम गोर्डे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहात काम करतांना अनेक गोष्टींची शिकवणुक मिळाली ती सेवानिवृत्तीनंतरही उपयोगी पडणारी आहे. स्पर्धेत सहकारी साखर कारखानदारीने काय आत्मसात करावे याची शिकवण माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली. परिस्थीतीवर संघर्षाने मात केली. समर्थ सेवा मनुष्याचे प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देत असते. याप्रसंगी प्राचार्य विलास निकम, कैलास रक्ताटे, वाल्मीक कळसकर, संगणक विभागाचे चंद्रकांत जाधव यांची भाषणे झाली. सविता हौशिराम गोर्डे, कन्या सौ. स्नेहल विलास निकम यांच्यासह खाते प्रमुख, उप खाते प्रमुख, लेखा शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार लक्ष्मण वर्पे यांनी मानले.