एकूण 42 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )साई वेताळ ग्रुप कळंबुसरे या सामाजिक संस्थेतर्फे व समर्पण ब्लड बँक घाटकोपर (मुंबई) यांच्या सौजन्याने रामनवमी निमित्त उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील साई मंदिर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला प्रमुख पाहूणे म्हणून साई मंदिर वहाळचे संस्थापक रवीशेठ पाटील, रायगड भूषण राजू मुंबईकर,न्हावा शेवा सीएचए संघटनेचे अध्यक्ष रुपेश भगत, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, सचिन तांडेल मेमोरीयल फॉउंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार तांडेल, कळंबूसरे ग्रामपंचायतीच्या सरपंच उर्मिला नाईक, उपसरपंच सारिका पाटील, ग्रामपंचायत सदस्य -समीर म्हात्रे, गोल्डन ज्यूबली चे अध्यक्ष माधव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात एकूण 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रायगडभूषण राजू मुंबईकर,साई मंदिर वहाळ चे संस्थापक रविशेठ पाटील यांनी साई वेताळ ग्रुप कळंबुसरे यांनी राबविलेल्या रक्तदान शिबीराचे कौतूक केले. सुनिल वर्तक हे रक्तदान शिबीर अनेक ठिकाणी भरवितात त्यांचेही कार्य उल्लेखनीय आहे असे सांगत साईमंदिर वहाळचे संस्थापक रविशशेठ पाटील यांनी साई मंदिर वहाळ येथे मे महिन्यात महा रक्तदान शिबीर घेण्याचे घोषित केले. विविध सामाजिक संस्था, संघटनांना , समाजप्रेमींना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचेही आवाहन रविशेठ पाटील यांनी यावेळी केले. साई वेताळ ग्रुप कळंबूसरे आयोजित रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी साई वेताळ ग्रुप कळंबुसरेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, सदस्य -नरेश पाटील, शैलेश पाटील, शुभम पाटील, स्वप्नील पाटील, हर्षद पाटील, रंजित पाटील, क्षितिज म्हात्रे, यतिश भेंडे, अभिजित पाटील, सुयोग पाटील, विलास भेंडे, सचिन भेंडे,प्रतीक म्हात्रे, सुनिल वर्तक यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल वर्तक, जीवन डाकी यांनी केले.