नगर – आंतरराष्ट्रीय सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेतही अहमदनगर रनर्स क्लबच्या 40 सदस्यांनी सहभाग नोंदवून कमी वेळेत सर्वांनी स्पर्धा पूर्ण करुन सातारामध्येही नगरच्या नावाचा डंका वाजविला.
सातारा येथे पार पडलेल्या स्पर्धेत विविध संस्था, संघटना, क्लबसह असंख्य सदस्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. नगरच्या अहमदनगर रनर्स क्लबच्या 40 सदस्यांनी दोन, अडीच व अडीच तासाहून अधिक अशा तीन प्रकारात होणारी मॅरेथॉन स्पर्धा काही सदस्यांनी गोल्ड, काहींनी सिल्व्हर्स तर काहींनी ब्राँझ पदके मिळविली. अत्यंत नावाजलेल्या अशा या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग असलेली ही मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान आपल्या अहमदनगर रनर्स क्लबच्या सदस्यांनी स्विकारुन स्पर्धा पूर्ण केली. नगरच्या नावाचा डंका सातार्यात वाजविला. यावेळी अहमदनगर रनर्स क्लबमधील 2023 चे चार कॉम्रेडस् मॅरेथॉन फिनिशअर यांनी सुद्धा टीम सोबत रन केला, अशी माहिती क्लबचे सदस्य अमृत पितळे यांनी दिली. सातारा येथे जाऊन सहभाग नोंदवून कमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल सर्व सदस्यांचे नगर शहरातील विविध संस्था, संघटना, क्लबने अभिनंदन केले.