देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा ते कोल्हार पायी दिंडी सोहळा. Dindi ceremony from Deolali Pravara to Kolhar on foot नवराञ निमित्त साडेतीन शक्ती असलेल्या भगवती मातेच्या दर्शनासाठी देवळाली प्रवरा शहरातून पायी दिंडी निघते.या दिंडीत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणातअसते. गेल्या 15 वर्षा पासुन हा दिंडी सोहळा सुरु आहे.
देवळाली प्रवरा ते कोल्हार पायी दिंडी सोहळा अखंड कार्यरत आहे.सालाबाद प्रमाणे सातव्या माळेस दिंडी दर्शनासाठी जाते.दिंडी सोहळ्यात सुरवातीला तुरळ गर्दी होती.माञदिंडी सोहळ्यातील महिलांची गर्दी पाहता विलक्षण रुप धारण केले आहे.दिंडी सोहळ्या निमित्त सोसायटी डेपो येथिल लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात वृषालीताई सुनिल कदम यांच्या वतीने चुडीदान कार्यक्रम होतो.माजी नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम व प्रितीताई कदम यांच्या हस्ते रथ पुजन करुन दिंडी सोहळा कोल्हारच्या दिशेने प्रस्थान ठेवते.15 वर्षात या दिंडींने विशाल रुप धारण केले आहे.दिंडी देवळाली प्रवरा, राऊतवाडी,चिंचोलीफाटा या मार्गे कोल्हार येथे दुपारी 5 वा दिंडी पोहचते. साडेतीन शक्तीपिठ असलेल्या देवीचे दर्शन घेवून सायंकाळी दिंडी देवळाली प्रवरात पोहचते.
आराधी मंडळ-अशोक बर्डे, सुरेश बर्डे, सागर सकट, भारत रोकडे, योगेश दीपक सरोदे, मंगल सूर्यवंशी, जिजाबाई बर्डे, सोहम अमाप, सार्थक अमाप आदींनी देवीच्या आराध्य गिते सादर केली.
कोल्हार येथिल देवीच्या मंदिरात दिंडी सोहळ्याच्या वतीने प्राची चव्हाण,गणेश चव्हाण,अनिता उंडे,राजेंद्र उंडे,सुनिता वाळके,राजेंद्र वाळके,मनिषा कदम,अशोक कदम,प्रमिला गवळी,अशोक गवळी,वनिता कडू,बापुसाहेब कडू,सुनिता ढुस,संजय ढुस,पुजा भुमकर, दिपक भुमकर आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक राजेंद्र चव्हाण,दिंडी प्रमुख कांता पा.कदम यांच्या नियोजनाखाली दिंडी आयोजित केली जाते.दिंडी सोहळ्यात ह.भ.प. बाळासाहेब मुसमाडे, अण्णासाहेब मोरे, नानासाहेब शिरसाठ, भाऊसाहेब पाटील कदम, मृदंगाचार्य बाबासाहेब सरोदे, दामू अण्णा उमाप, निवृत्ती होले, संजय ढुस, गोरख देवगिरे, एकनाथ पठारे, अशोकराव गवळी, भरत मोरे, चद्रकांत भूमकर, संजय कदम, बाबासाहेब सांबारे, भास्कर चव्हाण,माजी नगरसेविका बेबीताई मुसमाडे, लंकाताई पवार,यमुनाबाई होले, संगीताताई वाळुंज, मंदाताई भांड आदी सहभागी झाले होते.