नगर – अहमदनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतन पथक अधिक्षक रामदास म्हस्के यांनी जिल्ह्यातील सेवानिवृत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालयाचे, सैनिक शाळा, आश्रम शाळा आदिंमधील शिक्षक-शिक्षकेतरांचे 7 व्या वेतन आयोगातील 5 व्या थकित हप्प्यांची देयके जुलैच्या वेतनासोबत मागितली असून, मंजूर अनुदानानुसार ऑगस्टमध्ये त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे, अशी माहिती सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली.
दि.01/01/2016 नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना यापुर्वीच चार हप्ते टप्प्याटप्याने मिळालेे आहेत. शासनाकडून कोरोना काळातील 18 महिन्यांची महागाई फरकाची थकबाकी मिळणे अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचार्यांना मिळल्यानंतर राज्य कर्मचार्यांना, शिक्षकांना मिळणे क्रमप्राप्त राहिल, ही ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची पुण्याई आहे.
2019 मध्ये देंवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी 7 वा वेतन आयोग लागू केला होता. आश्वासित केल्याप्रमाणे फरकाची रक्कम पाच हप्त्यामध्ये देण्याचे मुर्त स्वरुप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्याने सर्व हप्ते मिळाल आहेत. याबद्दल सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाच्े अध्यक्ष रमेश जाधव, सचिव रोहिदास कांबळे, उपाध्यक्ष एकनाथ जगताप, कार्य.सदस्य प्रभाकर खणकर, जयसिंग कारखिले, महिला सदस्या सौ.सुरेखा लुटे, सौ.सुनिता शिदोरे आदिंनी मन:पुर्वक धन्यवाद दिले आहेत.
जाने2024 ते जुन 2024 दरम्यान 4 टक्के महागाई फरक जुलैच्या पेन्शनमध्ये जिल्हा कोषागार अधिकार्यांमार्फत पेन्शनमध्ये समाविष्ठ केला जाणार आहे, तसे शासन आदेश निर्गमित झाले आहेत. अशी माहिती सचिव रोहिदास कांबळे यांनी दिली.