ओंकार दळवी यांचा वाढदिवस मुकबधीर शाळेत साजरा
जामखेड तालुका प्रतिनिधी :
आनंदाचे काहीक्षण विकलांग शाळेत जाऊन घालवून मानसिक समाधान मिळते .आज समाजात विकलांग लोकाबाबत सहानुभूती दिसून येत नाही. जे अंधारात आपला मार्ग शोधत आहेत, अशा व्यक्तिंना आपल्या हस्ते मदत करून प्रकाशात आणण्याचे सेवाकार्य अशा स्वेच्छेने काम करीत असलेल्या संस्थेत जाऊन मदत करणे ही एक सेवाभावीवृती समाजात जोपासने गरजेचे असल्याचे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आरंभ फाउंडेशन मार्फत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ओंकार दळवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने येथील ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ संचलित निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत बसुन त्यांच्या अडी अडचणी जाणून घेत, त्यांना फळे बिस्किटे खाऊ वाटप करून दळवी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील,जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे,पत्रकार संघाचे तालुकाउपाध्यक्ष समीर शेख ,सचिन अटकरे,नवनाथ गव्हाणे,चेतन राळेभात,अशोक हुलगुंडे,प्रविण करडकर,अक्षय ठाकरे,संजय फुटाणे,सद्दाम शेख मयूर टेकाळे,विक्रम जमदाडे शाळेचे मुख्याध्यापक गणेश गर्जे, अनिल दहिफळे उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी संस्थेची माहिती घेऊन मार्गदर्शन करून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन संस्थच्या कार्याला शुभेच्छ दिल्या