कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण चिमाजी जावळे तर उपाध्यक्षपदी सोमनाथ सगाजी रायभान यांची निवड करण्यात आली आहे. मागील शाळेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यानंतर ही पालक मेळावा घेऊन निवड करण्यात आली. सोनेवाडी शाळेत गेल्या दोन वर्षापासून तीन शिक्षकांची कमी होती. शिक्षक मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी जावळे यांनी ग्रामस्थांना बरोबर घेत शिक्षक मिळण्यासाठी मागणी केली होती. वेळोवेळी आंदोलन उपोषण देखील करण्यात आले होते. याची दखल घेत या शाळेत शिक्षकांची उपलब्धता शिक्षण विभागाकडून करण्यात आली असून काल ग्रामस्थांनी या कार्याची दखल घेत लक्ष्मण जावळे यांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षा सह अनिता मोरे, राहुल जावळे, संदीप मिंड, वैशाली जावळे, विजय दहे, सुखदेव गुडघे, योगेश जावळे, राजेंद्र सोदक यांची पहिली ते सातवी वर्गनिहाय आरक्षणा मधून निवड करण्यात आली.काल अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड मुख्याध्यापक श्री राहणे , निरंजन गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब जावळे, चिलू जावळे, अशोक घोडेराव, बबलू जावळे, शाळेचे शिक्षक अण्णासाहेब मोकळ, विलास गवळी, चंद्रविलास गव्हाणे, कांचन मोकळ, सुरेश धनगर, कविता पानसरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.निवडीनंतर अध्यक्ष लक्ष्मण जावळे यांचा सत्कार न्यायाधीश मेघराज जावळे, निरंजन गुडघे यांनी केला तर उपाध्यक्ष रायभान यांचा सत्कार उपसरपंच संजय गुडघे यांनी केला. फळे फुले विकास सोसायटीचे अध्यक्ष वामनराव जावळे , सचिव निरंजन जावळे, कल्याण जावळे, बबलू जावळे व मोहन जावळे यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष लक्ष्मण जावळे यांनी सांगितले की शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तेसह विविध समाजोपयोगी कामांना प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रहाणे यांनी मानले.