सोनेवाडीच्या सप्ताहाला यावर्षी चाळीस वर्षे पूर्ण होणार…

0

पत्रिका व पावती पुस्तकाचे पूजन संपन्न 

कोपरगाव ; कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी चाळीस वर्षे पूर्ण करत आहे. सद्गुरु गंगागिरीजी महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज खेडलेझुंगे यांच्या आशीर्वादाने वै. पांडुरंग महाराज वैद्य यांनी या सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली.या सप्ताहाचे ध्वजारोहण जनार्धन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यच्या हस्ते होणार आहे.सरपंच सौ शकुंतला गुडघे व श्री निरंजन गुडघे यांच्या हस्ते काल पत्रिकेचे व पावती पुस्तकाचे पूजन करण्यात आले. पुरोहित विक्रम कुलकर्णी गुरु यांनी या कार्यक्रमाचे पुरोहित्य केले.

शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 पर्यंत या सप्त्याचा कालावधी राहणार आहे.  सप्ताह काळामध्ये मोनिकाताई महाराज येवले, नंदकिशोर महाराज देवकर, योगेश महाराज शिंदे, रेखाताई महाराज काकड, दीपक महाराज ढोकळे श्रीराम दरबार वारकरी संस्था, भाऊसाहेब महाराज जाधव ,ऋषिकेश महाराज कुयटे, प्रतिभाताई महाराज जाधव यांचे 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान 9 ते 11 या वेळेत कीर्तन होणार आहे. तर सप्ताहाची समाप्ती 17 ऑगस्ट 2024 रोजी स्वरभास्कर अमोल महाराज घुगे अमरावतीकर यांच्या काल्याचे कीर्तनाने होणार आहे. पहाटे काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण ,संध्याकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन व जागर असा दैनंदिन कार्यक्रम आहे. मृदुंगाचार्य धीरज महाराज कुऱ्हे, गायनाचार्य अक्षय महाराज चंद्रे, शरद महाराज दिघे व श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्था तांदुळवाडी येथील विद्यार्थी कीर्तन कार्यक्रमात साथ सांगत करणार आहे. सोनेवाडी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वारकरी भजनी मंडळ ,सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here