सोनेवाडीत कविताताई साबळे यांच्याहस्ते साई कथेची सांगता

0

कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे काल जायपत्रे वस्ती येथील साई मंदिर परिसरात रामनवमीच्या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या साई कथेची सांगता भागवताचार्य कविताताई साबळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी  साईकथाकार गणेश महाराज दिंडोरीकर, नंदकिशोर जायपत्रे,निरंजन जावळे, शिवाजी जावळे, आनंदराव जावळे, बाबासाहेब फटांगरे ,शिवाजी गुडघे, बापूराव जावळे, सागर रोहमारे, गंगाराम खोमणे, साहेबराव घोंगडे ,सचिन बोंडखळ, टिलु पोतकुले,उदय घोंगडे, सुनील बोंडखळ, जालिंदर बोंडखळ, राहुल राऊत, भगीरथ जावळे, शशिकांत लांडगे, बाळासाहेब बोंडखळ, राहुल शिंगाडे, योगेश जायपत्रे,राधाजी माळी, प्रशांत जायपत्रे, संजय जायपत्रे ,पंडित जावळे, आप्पासाहेब जावळे अदी उपस्थित होते. ओम साई मित्र मंडळ व जायपत्रे येथील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सात वर्षापासून साईबाबा मंदिर परिसरात साई चरित्र पारायण सोहळा अविरतपणे सुरू आहे. साई कथेचे पारायण गणेश महाराज दिंडोरीकर यांनी केले. तर गावातील अनेक ग्रामस्थांनी या पारायणात आपली उपस्थिती दिली. पारायणाची सांगता कविताताई साबळे यांच्या प्रवचनाने करण्यात आली. प्रवचनानंतर नंदकिशोर जायपत्रे व सिंधूताई जायपत्रे यांच्या हस्ते कविताताई साबळे व गणेश महाराज दिंडोरीकर यांचा सत्कार करण्यात आला. गावातील भाविकांना कथेच्या सांगता कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शेवटी सर्वांचे आभार साई मंदिराचे व्यवस्थापक नंदकिशोर जायपत्रे यांनी मानले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here