सोमैया महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय कार्यशाळा

0

कोपरगाव :
” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : आंतरविद्याशाखीय शिक्षण’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा येत्या १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे”, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ. व्ही. सी. ठाणगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी सांगितले की, ” माजी आमदार स्व.के. बी. रोहमारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी तर्फे विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्यापैकीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने हा एक उपक्रम संपन्न होत आहे. या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.विजय जोशी (अध्यक्ष, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अंमलबजावणी विभाग,महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते होणार असून या कार्यशाळेत पुणे विद्यापीठ विज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. एम बी. कुरूप (सचिव, केळकर एज्युकेशन सोसायटी, मुंबई), डॉ. विष्णू पाटील, (देवगिरी कॉलेज, औरंगाबादचे अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक), प्राचार्य के.सी. मोहिते (शिरूर कॉलेज), डॉ. प्रमोद पाब्रेकर (वरिष्ठ सल्लागार, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, मुंबई) व इतर देशपातळीवरील अनेक उच्च शिक्षणतज्ञ ‘आंतरविद्याशाखीय शिक्षण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, भारतीय ज्ञान-अभ्यास परंपरा व भारतीय भाषा, संस्कृती आणि परंपरा’ आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.”
या कार्यशाळेत वरिष्ठ महाविद्यालयातील विशेषतः देशभरातील प्राध्यापक, शिक्षण तज्ञ, अभ्यासक व संशोधक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, अॅड . संजीव कुलकर्णी व विश्वस्त, संदीप रोहमारे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here