विडी कामगार महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या कार्याचा गौरव
अकोले : महाराष्ट्र शासन च्या महिला व बालकल्याण विकास आयोजित कळस बू ग्रामपंचायत च्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार विडी कामगार महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सौ. सखुबाई वाकचौरे व मंगल सोनवणे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
कळस बू येथे जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या शुभहस्ते व सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हभप देवा महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, संचालक प्रकाश आल्हाट, डी टी वाकचौरे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष नामदेव निसाळ, शिवसेना नेते रावसाहेब वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वाकचौरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने गावातील सामाजिक कार्यातील दोन महिलाना हा पुरस्कार सुरु केला आहे. कळस ग्रामपंचायत च्या वतीने सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे व श्रीमती मंगल आनंदा सोनवणे यांचा तर कळस गावचे मंडल अधिकारी पदी मनीषा ढगे वाकचौरे व नगररचना अधिकारी वर्ग १ पदी प्रज्ज्वल वाकचौरे यांची निवड झालेबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
सौ. सखुबाई वाकचौरे यांनी विडी कामगार चळवळीत अनेक वर्ष काम केले असून अनेक वेळा तुरुंगवास भोगला आहे. महिलांना गावात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून विडी कारखाना सुरु केला. आदिवासी कुटुंबाला घरकुलासाठी एक गुंठा जागा दिली होती. कोरडवाहू शेतीचे अपार कष्ट करून बागायती जमिनीमध्ये रूपांतर केले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु केला याची दखल घेऊन जिल्हा परिषद नगर ने आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. मंगल सोनवणे यांनी कोरोना काळात रुग्ण सेवा बजावली आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक सरपंच राजेंद्र गवांदे यांनी तर सूत्रसंचालन सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी केले. आभार उपसरपंच केतन वाकचौरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसेवक पी.बी.देशमुख, कामगार तलाठी सागर लांडे, कृषी सहाय्यक अमृता गोंदके, शिक्षक भागवत कर्पे, आरोग्य सेविका सोनली लोखंडे, प्रतिभा अंदुरे, अंगणवाडी सेविका मालती गोसावी, आशा ढगे, संगीता वैराट, ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे, माधव वाकचौरे, शंकर वाघमारे, पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोट:- ग्रामपंचायतच्या वतीने दिलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हा विडी कामगार चळवळी चा सन्मान आहे. दरवर्षी गावात दहावी प्रथम येणाऱ्या विध्यार्थिनीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार सन्मानपत्र व पाचशे रुपये बक्षीस देऊन सन्मान करणार आहे.
– सखुबाई पुंजा वाकचौरे