सौ.सुशिलामाई काळे यांच्या स्मरणार्थ श्री संभाजी विद्यालयात क्रिकेट स्पर्धां संपन्न

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावतालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत संकुलातील श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्याललयात सालाबादप्रमाणे याहीवर्षी सौ.सुशिलामाई शंकरराव काळे उर्फ माईसाहेब यांचे २३ व्या स्मरणार्थ  तालुका स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धां नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.

                या स्पर्धेचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कचरू कोळपे होते.स्पर्धेचे हे २१ वे वर्ष होते. स्पर्धेतील सर्वच सामने अटीतटीचे झाले असून अंतिम सामना सुदर्शन अकॅडमी कोपरगाव व विद्या प्रबोधिनी कोपरगाव या संघामध्ये झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात कोपरगावच्या सुदर्शन अकॅडमी या संघाने विद्या प्रबोधिनी संघाला नमवत प्रथम क्रमांक पटकावून फिरता चषक आपल्या नावे केला तर विद्या प्रबोधिनी कोपरगावचा संघ उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेमध्ये कोपरगाव येथील भागचंद माणिकचंद ठोळे अकॅडमी, सुदर्शन अकॅडमी, विद्याप्रबोधिनी, के.बी.पी. प्राथमिक विद्यालय कोपरगाव, जिल्हा परिषद शाळा कोळपेवाडी, जिल्हा परिषद उर्दू शाळा कोळपेवाडी व श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर अशा एकूण ८ संघानी सहभाग घेतला होता. विजेत्या संघास फिरता चषक व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

                यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण चंद्रे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य बापूसाहेब जाधव, वसंतराव कोळपे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हाळनोर, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, राजेंद्र निकम, विवेक कुलकर्णी, रिजवान पठाण, राक्षे सर, देवकर सर, श्रीमती कुमावत, श्रीमती तेलोरे, अब्दुल महमद, किरण वसावे, प्रकाश गायकवाड आदी संघाचे प्रशिक्षक यांचेसह पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी पालक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, जगदीश बैरागी, श्रीहरी दवंगे, मच्छिंद्र पंडोरे,यांचेसह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष थोरात यांनी केले तर आभार रवींद्र शिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here