कोपरगाव प्रतिनिधी ;
“आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपला देश आणि समाज प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असताना त्यात समस्त स्त्रियांचे योगदान नक्कीच उलेखनीय असे आहे. तरी देखील आजही असंघटित क्षेत्रात महिलांच्या संदर्भातील ‘समान काम समान मोबदला’ हे तत्त्व स्विकारून देखील आजही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन दिले जात नाही. या स्त्रियांच्या संदर्भातील विधायक बदलांचे वाहक बनण्याची गरज असल्याचे प्रतिपादन,” असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला सबलीकरण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजय ठाणगे बोलत होते.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करताना प्रारंभी प्रतिमापूजनानंतर महाविद्यालयातील महिला कर्मचारी आणि महिला प्राध्यापिकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापिका तसेच विविध शैक्षणिक तसेच क्रीडाप्रकारात नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थिनींचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रा. मिलीता वंजारे, प्रा. नन्नवरे, प्रा. जांभुंरकर, प्रा. मोरे, प्रा.खाडे, आदी प्राध्यापिकांचा तसेच कु मेघा सोनवणे, अनुजा पवार,कु. प्रियंका जोगदंड, कु. सुप्रिया गायकवाड या विद्यार्थिनींचा समावेश होता. याप्रसंगी कु.प्राप्ती बुधवंत, प्रा रोहिणी घुगे व यांनी काव्यवाचन व मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख डॉ.नीता शिंदे यांनी , सूत्रसंचालन प्रा. कोमल अडसरे यांनी तर आभार महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. संतोष पगारे डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. शैलेंद्र बनसोडे, डॉ. बाबासाहेब गव्हाणे, डॉ. गणेश चव्हाण डॉ. वसुदेव साळुंके आदी प्राध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मिलिता वंजारे, प्रा. जयश्री खंडिजोड, प्रा. सुवर्णा चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.