जामखेड तालुका प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे आज दि. १२ रोजी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती व खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप पाटोदाचे सामाजिक कार्यकर्ते मा. सरपंच गफ्फार पठाण यांच्या वतीने वाटप करण्यात आले.
यावेळी मा. सरपंच गफ्फार पठाण म्हणाले गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेताच नाही. ते एक लोकप्रिय नेते होते ते शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब उसतोडणी कामगार च्या पाठीशी खंबीर पणे उभे राहत होते उसतोडणी कामगार साठी त्यांनी महाराष्ट्रात मोठ मोठी आंदोलने केली
सरपंच समीर पठाण म्हणाले, वयाची ८० वर्ष ओलांडूनही देशाचे नेते व माजी कृषी मंत्री खा.शरदचंद्रजी पवार आजही ते सक्रीय आहेत.आम्ही त्यांचे अखंड वाचन, चिंतन पाहत असतो. या महाराष्ट्राने देशाला जे काही नेतृत्व दिली आहेत त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार सर्वोच्च आहेत.
यावेळी माजी सरपंच समीर पठाण, बाप्पु मोरे ,कल्याण कवादे ,विष्णु भवर, गौतम मोरे ,जगन्नाथ मोरे, प्रकाश कडु ,बाबासाहेब माने ,भाऊसाहेब कवादे, नाना गव्हाणे, बाळु शिंदे ,सुखदेव शिकारे, अन्सार पठाण ,बांगर, राठोड मॅडम, हजारे मॅडम,जोगदंड मॅडम आदी शिक्षक वृंद व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.