स्वच्छ व सुंदर खेड्यांच्या निर्मितीसाठी एनएसएस स्वयंसेवकाची भूमिका महत्वपूर्ण -सौ.दुर्गाताई तांबे 

0

संगमनेर  : समृद्ध भारत देश घडविण्यासाठी खेड्यांचा विकास महत्वाचा असून त्यासाठी महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेतील युवंकाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे मत  नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यानी व्यक्त केले.    
           सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष संस्कार शिबिराचे उद्घाटन तालुक्यातील कऱ्हे या ठिकाणी संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  संस्थेचे सचिव  लक्ष्मणराव कुटे, सहसचिव  दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बी. आर. गवांदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, सरपंच, उपसरपंच, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष सुर्वे, प्रा. ललिता महाले, प्रा. स्नेहल थिटमे, प्रा.वैशाली शिंदे, प्रा. नानासाहेब दिघे आदि उपस्थित होते.
          यावेळी  सौ. तांबे म्हणाल्या की, आपल्यावर निसर्गाचे व समाजाचे अनेक ऋण आहेत, त्याची आपण परतफेड केली पाहिजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करता येतात. त्यासाठी विद्यार्थी दशेतच राष्ट्रीय सेवा योजना हे एक महत्वपूर्ण व्यासपीठ असून या माध्यमातून प्रत्येक स्वयंसेवकाने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे. गावाच्या विकासासाठी श्रमदान, स्वच्छता, वृक्षारोपण असे उपक्रम राबवून स्वच्छ व सुंदर खेंड्याची निर्मिती करणे शक्य असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी  लक्ष्मणराव कुटे म्हणाले कि ,  संस्कार ही यशस्वी जीवनाची शिदोरी आहे. समाजसेवेच्या माध्यमातून ती जपली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी दशेत राष्ट्रीय सेवा योजना हे एक उत्तम व्यासपीठ असून प्रत्येक स्वयंसेवकाने मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.या प्रसंगी दत्तात्रय चासकर,  बी. आर. गवांदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. संतोष सुर्वे यानी केले तर सूत्रसंचालन प्रा. स्नेहल थिटमे यांनी केले व प्रा. नानासाहेब दिघे यांनी आभार मानले.या प्रसंगी प्रा.वैशाली शिंदे, प्रा. ललिता महाले, प्रा. स्नेहल बिटमे, प्रा. श्रीनाथ भोर, प्रा. संतोष खामकर,  प्रवीण फटांगरे, अनिकेत वाणी, बाळासाहेब गोपाळे, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here