देवळाली प्रवरा / प्रतिनिधी अहमदनगर शहर स्थापनेचे औचित्य साधून नागरिकांचे आरोग्य सुधारून शरीर सुदृढ होण्यासाठी अहमदनगर सायकलिंग ग्रुप व इंडियन आर्मी यांनी भूईकोट किल्ला येथे हिस्टॉरिक रन स्पर्धा आयोजित केली होता. यात २१.६५ किलोमीटर अंतर फक्त अडीच तासात पूर्ण करुन देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या श्री.ञिंबकराज मोफत वाचनालयाचे साहय्यक ग्रथपाल संभाजी वाळके यांनी यश मिळवले. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग व्हावा म्हणून ‘ऑल फिनिशर्स ऑल विनर’ ही संकल्पना राबविण्यात आली. २१:६५ किलोमीटर अंतर साडेतीन तासात पूर्ण करावयाचे होते. सर्वात कमी वेळात वाळके यांनी अडीच तासात हे अंतर पळून पूर्ण केले. या स्पर्धेसाठी त्यांच्याबरोबर १२५स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. संभाजी वाळके हे देवळाली प्रवराचे रहिवासी असून ते देवळाली प्रवरा नगर परिषदेत श्री त्रिंबकराज मोफत वाचनालय येथे सहाय्यक ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्यासह पालिकेचे माजी पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.
■ विक्रमवीर सायकलपटू ■■ संभाजी वाळके यांनी या आधी देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ३०१ किलोमीटर हे अंतर एक दिवसात व देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर २५० किलोमीटर एक दिवसात जाण्याचा विक्रमही प्रस्थापित केला होता. कोल्हापूरच्या पन्हाळा व्हील मॅरेथॉन स्पर्धा ही सप्टेंबर । महिन्यात घेतली जाते. परिपूर्ण ओलावा असलेल्या पन्हाळा किल्ल्यावर सगळीकडे धुके पसरलेले असते. या परिस्थितीत पन्हाळा किल्ला चढणे, उतरणे व वरती पाच किलोमीटर पळणे हे अडीच तासात पूर्ण करण्याचे बंधन असते. वाळके यांनी ते अंतर २ तास २६ मिनिटात या पुर्ण करुन विक्रम प्रस्थापित केला होता.