नगर – अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त सायकलिंग क्लब व उद्योजक गौरवजी फिरोदिया यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘हिस्टॉरिक रन’ या स्पर्धेत जया व नमन खंडेलवाल या बहिण-भावाने प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले.
सदर स्पर्धा 15 कि.मी. व 10 कि.मी. अशी मॅरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेत 15 कि.मी. मध्ये जया रितेश खंडेलवाल हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिने ही स्पर्धा 95 मिनिटात पूर्ण केली. तर 10 कि.मी. स्पर्धेत नमन रितेश खंडेलवाल याने 42 मिनिटात पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकाविला.
या दोन्ही खेळाउूंना वडिल रितेश जगदीश खंडेलवाल व एसपीजे स्पोर्टस् क्लबचे संदिप जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. कु.जया व नमन या दोघांनी यापुर्वीही अनेक जिल्हा व राज्यस्तरील स्पर्धेत सहभागी होत यश मिळविले आहे. जया व नमन खंडेलवाल या बहिण-भावांच्या स्पर्धेतील यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.