हेमराज जावळे यांना लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार

0

सोनेवाडी (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील फटांगरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कृतीशील शिक्षक हेमराज कर्णासाहेब जावळे यांना लायन्स क्लब इंटरनॅशनल अहमदनगर यांच्याकडून शिक्षण क्षेत्रात आदर्श काम केल्याबद्दल 2024 /25 यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्लबचे कार्याध्यक्ष विजय सारडा , एमजेएफ लायन्स राजेंद्र गोयल डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर व श्रीमान उबाळे यावेळी उपस्थित होते.

फटांगरे वस्ती शाळेत एकूण २० वर्षापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ते अध्यापनाचे काम करतात. सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ते सदैव प्रयत्न करतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सोनेवाडी परिसरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here