होय विवेकभैय्या आमदार होणार – काका कोयटे 

0

कोपरगाव : काल राष्ट्रीय हथकरघा दिनाचे औचित्य साधून समता हॉल येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश(काका) कोयटे,संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना काका कोयटे यांनी कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी व व्यावसायिकांना मदत होण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे हे आमदार होतील. विधान भवन परिसरात देखील आपल्या स्थानिक कलाकुसरीचे अहींसा केंद्राचे स्टॉल लागून दर्जेदार प्रतिसाद मिळेल. हथकरघा व्यवसायाशी निगडित कलेला न्याय मिळून महिलांना मोठी संधी उपलब्ध होईल आशयाचे विधान केले आहे.यामुळे अनेकांच्या मनात आहे ते काका कोयटे यांनी व्यक्त केल्याने कोपरगाव मतदारसंघात एकच चर्चेला उधाण आले आहे.

होतकरू आणि धाडसी युवा चेहरा म्हणून विवेकभैय्या यांनी जनतेच्या मनात घर केल्याने त्यांच्याकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणून नागरिक पाहतात.व्यापारी,उद्योजक,राजकीय नेते,शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते,नागरिक यांनी हेरलेला हा अभ्यासू नेता लवरकच विधानसभेत आपला आवाज बुलंद करेल अशी अपेक्षा सर्वांना असल्याचे यातून अधोरेखित होते. येवल्याची साडी पाच हजाराना आणि आपली दहा हजाराला असे झाले तर खरेदीवर परिणाम होईल त्यामूळे आपल्याला बाजारपेठेची प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे.सुदैवाने आपल्याकडून समृध्दी महामार्ग गेला आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकतो असे कोयटे म्हणाले.

हातमाग कर्मचारी हे आपल्या कलेतून सुबकता निर्माण करतात.अहिंसा संस्थेने केलेल्या प्रयत्नांचा आता वटवृक्ष होतो आहे.अहिंसेच्या कापडी वस्तू राज्यासह देशात अनेक ठिकाणी मागणी होत आहे.बाजारपेठ नावलौकिकाकडे घेऊन जाण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे जे आपण सर्व मिळून करू आणि कोपरगावची सर्वार्थाने प्रगती करू.या सर्व महिला भगिनींनी एकत्रित येत उभा केलेला आदर्श सर्वांना प्रेरणा देणारा आहे त्यांना शुभेच्छा देते अशा भावना सौ.रेणुकाताई कोल्हे यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रीय हथकरघा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणूकाताई कोल्हे यांनी समता पतसंस्था हॉल येथे आयोजित १० व्या राष्ट्रीय हथकरघा कार्यक्रमाचे उदघाटन केले.यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि विद्या अहिंसा हथकरघा केंद्रास भेट दिली. यावेळी शोभनाताई ठोळे,अरुणा लोहाडे,कल्याणी गंगवाल, मुंबई विणकर सेवा केंद्राचे मनीष पवईकर,राजेश ठोळे,जैन समाजाचे पंच अशोक पापडीवाल,अमित लोहाडे,प्रितम गंगवाल,प्रेमचंद गंगवाल, हातमाग कारागीर प्रियंका सुपेकर आदींसह महिला भगिणी आणि नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here