अक्षय त्रितीया .. ..
कृष्ण सखा धावे देई
कृष्णेस रे अक्षयवस्त्र
अचंबित सभा सारी
संस्कृती होता निर्वस्त्र
कौरवी धाबे दणाणले
पाहता नारायणअस्त्र
महिला सन्मान करा
शीलरक्षण हेचि शस्त्र
आजच्या दिनी दिले
युधीष्टिरा अक्षय पात्र
भुकेला कुणी न राहो
पहा राजा संदेश मात्र
पुरातन काळापासून
अक्षय त्रितीया पवित्र
जोडावे एक दुस-या
बनवा दुश्मनास मित्र
आज उदक कुंभदान
सुरु करा नवीन सत्र
पिपासीत नसो कुणी
सुखी सारे दिन रात्र
आंबे वाटा गरिबांना
तृप्तता पावतीलं पित्र
नव रुपात सण करु
पुण्यत्व पावे गात्रगात्र
-हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996