दंगल असो कुठली
एसटीला करे लक्ष्य
भडकल्या अंगारात
होई अग्नीमुखी भक्ष…
मोड तोड मार झोड
वेधून घ्यावया लक्ष
मालमत्ता नुकसानी
चुराडतो रुपये लक्ष…
अहर्निश सेवा बाधा
रिकामे पडती कक्ष
बुडू लागला महसूल
अस्वस्थ होती अक्ष…
सुरक्षापुरवावी कशी
रे किती रहायचे दक्ष
अतिरेकी हिंसाचारा
कुणी ना घेणारं पक्ष…
आधी चाले तोट्यात
पगार देण्या दुर्भिक्ष
आत्मघात का कळेना
म्हणे आपण चाणाक्ष …
कृतज्ञता हवी जराशी
सेवा मिळते निरपेक्ष
कृतघ्नता पराकोटी
नको हेतू हे अपरोक्ष..
प्रवाशांचे हाल अति
डोळ्यांने पाहे प्रत्यक्ष
घरआपले जाळू नका
सदैव ठेवावा कटाक्ष..
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
2
लालपरी ..
खडखडे लालपरी
धावतेयं रस्त्यावर
कर्मचारी ते बिचारे
संसार ये रस्त्यावर…
वाढत राही तोटा
तिजोरीवर ये भार
इतरां मिळे बोनस
यांचा लांबतो पगार…
तिकडे हो पक्वान्न
इकडची चूल गार
दिवाळी रे सर्वांची
करावाजरा विचार…
घरात बसूनि कुणी
कमावतो भारंभार
सोडवला अंतीप्रश्न
लेकरे देती आभार..
कायमचा घालवारे
लालपरीचे आजार
नेहमी तीचंसमस्या
का करता बेजार…
शिवनेरी शिवशाही
भरला नवा दरबार
विठाई न् लालपरी
कात टाकली दुबार…
वर्षे येई पंचाहत्तर
लालपरी कारभार
ई वाहन शिवाई ते
आणेल नवा उभार..
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996