ओवाळाया येते
शेजारची ताई
भाऊ नसे तिला
मानी मला भाई …
कपाळाले टिळा
खाया दे मिठाई
सख्खी ना तरी
आशीर्वाद देई…
ओवाळणी तुज
काय हवी ताई
म्हणे तुज सम
मिळो खूप भाई…
रक्ताचे नात्याचे
आगळी रेशमाई
मानले नात्याची
रे नाही ऊतराई…
नाते असे गोड
व्हावे ठाई ठाई
हीचं भाऊबीज
विठाई मिठाई….
परमेश्वरे निर्मीले
रुपडे दुसरे आई
भगिनी रुपातूनि
रे छत्र चामरे डोई….
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.