बंदिस्त तिजोरी पूजा
लक्ष्मी माता हो खिन्न
विनियोग संचीत धन
रमा होणार सु प्रसन्न..
भरल्यापोटी अन्नदान
दाखवा अल्पसौजन्य
बरसता धारा पहाव्या
भेदभाव न करेपर्जन्य …
दिल्याने होतआहे अरे
भरभरुनवाढेल उत्पन्न
आपल्यासहित शेजार
रे बनावा समृध्द संपन्न…
वाटून खाता शीतशीत
चवदारअधिक ते अन्न
बिथरेल अंधार सुध्दा
विनाशेलकाळाकभिन्न ….
एकट्याने करताजेवण
स्वादिष्ट घास रे कदान्न
रमेला प्रियतम मेहनत
सर्वांचेच असते गणान्न…
संतुष्ट ना विष्णू लक्ष्मी
दावा भोज जरी छपन्न
होईलं संतुष्ट परो परी
भुकेल्या भरविता अन्न…
अहंकारी होता दातृत्व
पुण्य होई छिन्नविछिन्न
कुबेर असून तिजोरीत
अठरा विश्वे जणूं दैन्य …
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.
*** दैनिक लोकप्रभात आणि Press Alert परिवाराकडून सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! *****