व्यवस्थापन कुजले
दुर्गंधी सर्वत्र दर्वळे
आश्वासन तुडुंबलेले
आशा दावी दर वेळे…
हेलपाटे घालू दमले
केवढा घाम निथळे
भावना लवलेश ना
कोरडे पडलेले तळे…
शुभवार्ता येई कानी
वाटेकडे लागे डोळे
तपास योग्य दिशेने
विश्वास ठेवती भोळे
आरोपी धरे दोनतीन…
अचंबित झाले डोळे
कोर्टच्या आवरातचं
केसेस निभ्रांत लोळे
अटकपूर्व जामीन तो
काहींना त्वरित मिळे
कापले जाती भोपळे
तयार धार धार विळे
एन्काऊंटर रे कैद्याचे
केस तिसरीकडे वळे
किंतू परंतु शंकाकिडे
कायम मना वळ वळे
खरा न्याय झाला का
सांगा कुणीतर निर्मळे
खरे सत्य खोल लपले
कायम उदरी डचमळे
लीक ..
नेते भेटे एक दुजा
बातमी होते लीक
साधे पाणी पिताना
कशी बसली कीक…
आपुलकीची बंधने
नाते असे भावनिक
परस्परविरोधी जरी
असू शके जवळीक…
अचंबित होती सारे
कशी ही आगळीक
खाजगी आयुष्याला
का नसते मोकळीक…
भिन्नपक्ष असे म्हणून
का करुनये सोयरिक
जीवनावरी वैयक्तिक
कॅमेरा नजरा बारीक…
असू शकती कुणाचे
रे संबंध व्यावसायिक
घरातली नाती कुणी
का करी सामुदायिक…
पाहवेना रे नतद्रष्टांना
सारे चालले ठाकठीक
बेकिंग न्यूज दाखवाय
किती करे झिकझीक …
भेटीगाठी या घरगुती
का नसाव्या वैयक्तिक
न्यूज सुटतात जोरात
मॅटर बनवा जागतिक…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.