राजकीयभांडणाचा
आला खरोखर वीट
शिखर पाहिजे सर्वां
ढिसाळपायाची वीट
कुणीचंकसे कुणाशी
का बोलत नाही नीट
सकाळपासूनवादांग
शिव्याशाप होई धीट
बळीराजा चक्रावला
अवकाळी गार पीट
अनुदान मिळे कधी
पंचनाम्यात पायपीट
विरोधक सत्ताधारी
का जमेना गुळपीट
लोणी घालून सत्तेचे
हवे छान थालीपीठ
सामान्य माणसांची
उडली त्रेधा तिरपीट
महागाई भाव वाढी
करत राहे खिटपीट
साठमारी चालू ठेवा
आरोपाचीफिटन्फीट
बाकी उरलीयं फक्त
करा प्रत्यक्ष मारपीट
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996