धमक्या देतात नेते
पहाकरू पर्दाफाश
हातातलपवले पत्ते
दाखवे लांबून ताश
आविर्भाव मोठाला
अडकणार बदमाश
करतात उगाचं एक
का पाताळआकाश
खबरी भलते जबरी
चालते वेगाततलाश
कबरी उकरू काढे
तीचं सडलेली लाश
प्रकरणे लक्तरे सारी
काढतरहा सावकाश
माल मसाला पुरावा
निकालालाअवकाश
गाजावाजा असाकरे
समोरचे व्हावे निराश
भिती ग्रस्त करा त्रस्त
अटळआहे बुवा नाश
कोरीफाईल बंद ठेवा
जनतेचा बसे विश्वास
वातावरण ते प्रदूषित
कठीण घ्यायलाश्वास
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
www.kavyakusum.com
4
हीट रन धडे ..
एक हीट रन केस
सर्वांनी घेतले धडे
बारपबला जाताना
काळजात धड धडे
आधार कार्ड घ्यावे
हवेत सारे मिसरुडे
बिशाद नाही कुणा
उभे बाऊंसर धगुर्डे
कोवळीपोरे दिसता
ऐकवता बोल खडे
भारीसंशयीस्वभाव
रहा लाईनमधे खडे
मजाकरी किरकिरी
पहावे घड्याळाकडे
नंबर लागे मुश्किले
देवाला घालासाकडे
थेंबाथेंबाला तरसले
वाळून गेलेले नरडे
चविष्ट मुळी लागेना
चकणा मकणा खर्डे
भिंती सावटा खाली
रे मदिरा जराशी चढे
लक्ष दे घड्याळाकडे
बाऊन्सर बाहेर काढे
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.
www.kavyakusum.com