चुकून भाऊबिजेला
तो घराबाहेर पडला
अति उत्साह असला
उगाचं त्याला नडला…
कितीजणींनी त्याला
धरधरुन ओवाळला
मानलेल्या भगिनींनी
सुखप्रेमे जिव्हाळला…
खाऊनि गोडधोड ते
ओझे झाले पोटाला
किती तरी दिवसांनी
चव माधुर्य ओठाला
उरलीचं नाही जागा…
टिळा लावी कपाळा
नशीब जणूं रे खुलले
ओसंडूवाहे जिव्हाळा…
ओवाळणी घालताना
खिसा खाली झाला
मन ओथंबून वेडेपिसे
नभास टेकला झुला…
मानलेली नाती सुद्धा
गंगोत्री भेटवे जीवाला
बहिणीच्याअस्तित्वाने
भाव आला रे भावाला….
— हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.