सहल पावसाळी…

0

खुणावते  पर्यटकास

हवा मस्त पावसाळी

वर्षा सहली तुडुंबली 

मने सगळी  पिसाळी

आबालवृद्धधमन्यात

मुक्त संचार उसाळी

पर्यटक जे अविचारी 

दंगा मस्तीत कुसाळी

चिंता कुणा खर्चाची

रिती करे टांकसाळी

लुटावाटा गंमतमस्ती

दारु शारू  नरसाळी

स्टंटबाजी मारेबाजी

कसेदाजी सळसळी

अपघात घडता घात

सुरुहोतात धावपळी

निसर्गाशी  घेती पंगा 

दंगा धमाल  कुटाळी

रिल्सच्या नादा फंदा 

मृत्यूला  ते कवटाळी

ओरडत राहते सूचना

निर्देश कानी कपाळी

दोष माथी  यंत्रणेच्या 

आपणचं आणे पाळी

– हेमंत मुसरीफ पुणे.

  ९७३०३०६९९६ 

 www.kavyakusum.com

२)

नवीन योजना ..

लाडकी  बहिण खूश

आणली योजना नवी

अमंलबजावणी मात्र

काटोकोरपणात हवी

करा गोळा कागदपत्रे

सुरू सर्वत्र धावाधावी

कार्यालयात सरकारी

झुंबड गर्दी गावोगावी 

चुका कुठे काय होती

त्रुटी काढी बुध्दीजीवी

टिकाकार  घाली घाव

योजना ना अल्पजीवी 

जोरात चाले उदो उदो

स्तुतीकरती भाट कवी

लोणी काढा ताकातून

घुसळ घुसळे कसे रवी

सरकारी कर्मचा-यांची

असह्य  होती अरेरावी

लाचखोरी उपाळलेली

आतले काळे रंग दावी

कागदोपत्री जंजाळात 

नको ती अडवाअडवी

कसा होई सर्वर डाऊन

उत्तरे रेडी उडवा उडवी

लाभ मिळो सकलांना

अपेक्षा  नसे अवाजवी

कृत्ये  विचीत्र  कुणाची

सकल यंत्रणेस लाजवी

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here