आऊसाहेबआपणां
युग करते कुर्निसात
स्वराज्यबीज रुजले
मोती भरे कणसात…
राहू शकला असता
स्वस्थपणे वैभवात
लाथाडून चैन सारी
संघर्ष करी सुरुवात…
धनदौलत चाकरांंना
त्यागून दिले क्षणात
स्वराज्य प्रेम जागृत
उसळे कणा कणात…
मावळ्यांची एकजूट
गोडवा येई नात्यात
भगवा उंच गगनात
स्वप्न आणले सत्यात…
भक्कम बुरुजभिंती
निडरपणा किल्यात
हजारो हत्तींचे बळ
आऊच्या सल्ल्यात…
जाणता राजा दिला
इतिहास ये ऋणात
जाणवते ममत्व तव
जाग गं कणाकणात…
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.