कळण्यासाठी शिवबा
जाणा जिजाऊ माता
समजूनि घ्यावा अर्थ
पोवाडा जोशात गाता…
पहावी जिजाऊ सृष्टी
सिंदखेड राजा जाता
विचारआचरण करता
उमगेलं आऊची गाथा…
सामर्थ्य उजळे तेंव्हा
हो दीन दुबळ्या त्राता
कृतीत जिजाऊ कथा
न व्हावे केवळ श्रोता…
महिलासन्मान करावा
सर्व श्रेष्ठ रे नितीमत्ता
आचरणी दोष राहता
न उपयोगी बुध्दीमत्ता…
हिंदुत्व म्हणजे रे काय
समजाविते राजमाता
स्वराज्य सुराज्य होता
भगवा शोभणारं हाता…
अखर्वात जन्मास येते
अशी लखलख माता
जनते अलौकीक पुत्रा
जो वंदनीय हो जगता…
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.
4
राष्ट्रमाता ..
सिंधखेडराजा स्थळी
सहज कधीही जाता
थरार जाणवे आजही
जनली इथे राजमाता …
स्वराज्य निर्मीले जया
शिवबा राजा जाणता
घडविला असा सुपुत्र
रे धन्य जिजाऊमाता…
इथल्या पवित्र मातीत
जाणवे ओली ममता
इथल्या दगड धोंड्यां
कळली रे कणखरता…
भुईकोट तो राजवाडा
सांगतो आऊची कथा
रंग महाल उत्साहात
उलघडे आईची गाथा…
मोती तलाव पाझरतो
वात्सल्य रूपी सरिता
जिजाऊ सृष्टी सांगेलं
कशी होती राष्ट्रमाता…
भव्य दिव्य तो पुतळा
भासतो जणूं बोलता
अभिमानाने ताठ मान
झुकते अलगद माथा…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.