आत्मपरीक्षण..

0

अधून मधून नेहमी

करा आत्मपरीक्षण

मान्य करुन  प्रमाद

सुधारणा हो तक्षण

चालत असता वाट

सावधान क्षणोक्षण

काय पाहिले वाटेत

नोंदवं सर्वनिरीक्षण

चल अचल हरचीज

देते अमूल्य शिक्षण

बदल करा आवश्य

देण्या ऐवजी  दूषण 

उक्ती परिवर्त कृतीत 

नको पोकळ भाषण

कैक समस्या सुटती

करण्यानी संभाषण

सारवा नीत स्वताला

भुलावणी  आकर्षण

ठिणाग्यां  उडे  सतत

टाळावे अतीव घर्षण 

लक्ष ठेवा  ध्येयाप्रति

करे सद्वृत्तीचे रक्षण

षड्रिपु टपून बसलेले 

करण्या साठी भक्षण

– हेमंत मुसरीफ पुणे 

   9730306996..

 www.kavyakusum.com

पण ..

करता कुठली गोष्ट

आडवा शब्द “पण”

अशक्यप्राय शक्य

कशास करतो पण

वेगाला ये अडथळे

थबकू जाई आपण

सतत दबाव मनात

कायम येते दडपण 

दान देताआखडतो

बनतो उगाचं कृपण

बदलाव करी कोण

आडवे येते मी पण

वृत्ती  ठासते असूरी

हवे प्रत्येकां देवपण

ओळखले ना स्वतां

समोर असूनि दर्पण

प्रयास पडे अडकून 

थकून जाई समर्पण

किंतूपरंतु बिघडेहेतू

विषाणू बीजारोपण

मनापासून सदिच्छा

सकला करे संतर्पण

अ साध्य साध्य होते

स्वभावा आपलेपण

– हेमंत मुसरीफ पुणे 

   9730306996..

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here