मंत्रीपदास हट्टाहास
भांडणेहवी कशाला
मार्ग काढाया शिकवे
राज कारण प्रशाला…
मुळीचं नको कंजुषी
पद दे मागेलं त्याला
अडीचअडीचवर्षाचा
झक्कास हा फाॅर्मुला…
सत्ता हवी प्रत्येकाला
आळीपाळीनेसर्वाला
आवर घाला गर्वाला
सुरवांत नव्या पर्वाला…
मंत्रीपद हवे कळसूत्री
अधिकार ते नावाला
बोलवता धनी दुसरा
काय कळते गावाला…
नकार देणे कटू काम
नाही म्हणावे कुणाला
नाराजी बिघडवे खेळ
किंमत कुणा गुणाला…
पाहून घेऊ पुढचे पुढे
दिवसआजचा ढकला
विसरून जाईलं काळ
कुणी तो शब्द राखला…
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996…