व्हि आय पी नेत्यांना
वारी साठी आवताण
पांडुरंगापेक्षा अधिक
महत्व त्यांचे वरताण…
साहेब देताचं होकार
उत्साहा आले उधाण
चालते जय्यत तयारी
खुश सगळे दणादाण…
वारीसह व्हॅनिटी व्हॅन
नको साहेबांना ताण
एसी गाडीत करे वारी
मध्येच गळताचं त्राण…
पायांना छान आराम
शिवूनघेतले पादत्राण
खास सुरक्षा व्यवस्था
सर्वत्र बांधले मचाण…
इजा होऊ नये कसली
छान आणले अंगुष्ठाण
जागोजाग हेलिकॉप्टर
कधीही करती उड्डाण….
साहेबाचीवारी निर्धोक
कंठाशी आणले प्राण
आजूबाजूला बाऊंसर
बलशाली सारे सत्राण….
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६