यंदा करी पायीवारी
उर्मी उसळली उरी
एकादशीले आषाढी
आता भेटणार हरि
पायी चालतानावारी
अनुभूती येई न्यारी
मंतरलेले दिवस ते
बरसे सुखानंदलहरी
हातात झेंडे पताका
वृंदावन डोक्यावरी
असे वाटे संगतीला
प्रत्यक्ष चाले श्रीहरी
आबालवृद्ध नर नारी
चालेखुशीत म्हातारी
एकात्मता कायकशी
वारी चित्र ते चितारी
टाळ मृदुंगाचे गजरी
जातपात वय विसरी
चेहरे सारे सारखेचं
ओळख उरे वारकरी
हरिची कियमा न्यारी
सरली भेद महामारी
जगत राहो निरामय
पांडुरंगा तारी तारी
एकादशी रे अन्न वर्ज
तरी भूक नाही अंतरी
पाही लोचनी तो हरि
भूक मिटली निरंतरी
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
2
मोहरम महत्व ..
प्रेषिताची शिकवण
भाईचारा भाईजान
कसे वागावे शिकवे
ईद मोहरम रमजान
नमाजअदा कराया
बोलविते ते अजान
पातके जळून जाती
ज्ञातअज्ञात अंजान
दहा दिवस उपवास
अन्नाचा करे सन्मान
किंमत कळे रोटीची
खाना अल्ला समान
कुराणपठण करता
हरपे सारे देहभान
नमाज अदा करता
शुध्द करावी जुबान
हुसैन आणि हसेन
करबालामधे कुर्बान
क्रूरकर्मा यजीदचे रे
धुडकावले रे फर्मान
गरीबा देती जकात
समाजाचे अवधान
ईदी वाटता मुलांना
माणूसकीचे संधान
इस्लामची पाच तत्वे
जपे खरा मुसलमान
हजयात्रा घडे ज्यास
खाली झुके अस्मान
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996