मोहरम महिना मुस्लिमांसाठी धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. तर इस्लामिक कॅलेंडरचा हा पहिला महिना आहे, इमाम हुसेनने जुलमी शासक यझिदच्या अधीन होण्यास नकार दिल्याने शेवटी मृत्युला सामोर जावं लागलं. मोहरम प्रेषित मुहम्मद पैगंबरचा नातू हुसेन इब्न अली यांच्या मृत्यूचे स्मरण करतात, जो मोहरमच्या दहाव्या दिवशी करबलाच्या लढाईत क्रूरपणे शहीद झाला होता, ज्याला आशुरा दिवस म्हणून ओळखले जाते. ही लढाई दडपशाही विरुध्द न्यायाच्या लढयाचे प्रतिक आहे. सुरुवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन यांच्या मृत्यूची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. ताबूत बनविण्याचा प्रघात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारतात कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका दांडक्याला ‘पंजा’ लावून चांगले वस्त्र बांधतात.
हा महिना रमजान इतकाच पवित्र मानला जातो. या महिन्यात भांडणतंटा, लढाई करणे निषिद्ध आहे. मोहरमच्या महिन्यातील दहावा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. या दिवसाला ‘अशूरा’ असे म्हणतात. चंद्रकोर दर्शनानंतरचा दहावा दिवस हा अशुराचा असतो. या दिवशी करबला युद्धात शहादत प्राप्त झालेल्या मोहम्मद पैगंबरांचे नातू इमाम हुसेन व त्यांचे कुटुंबीय-अनुयायांची आठवण केली जाते. त्याच बरोबर मोहम्मद पैगंबरांचे जावई अली व अलींचा मोठा मुलगा हसन यांचेही स्मरण केले जाते. कारण या युद्धाच्या दरम्यान त्यांनाही फार त्रास सहन करावा लागलेला आणि हे युद्ध मुस्लिम समुदायाच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढण्यात आलेलं.
दुःखात तोंडावर आणि छातीवर प्रहार करणे आज शोक विधींमध्ये सामान्य आहेत, ज्याचा हेतू हुसेनच्या वेदनांमध्ये सहभागी होण्यासाठी आहे. आशुरा हा दिवस मोहरमच्या 10 तारखेला असतो. जर तुम्ही या दिवशी उपवास केलात तर अल्लाह तुमची मागील वर्षाची पापे पुसून टाकेल (मुस्लिम). आपण या शुभदिवशी उवास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या प्रतिफळाचा लाभ घ्यावा. हुसेन यांना शहीद म्हणून स्मरण ठेवण्यासाठी लोक “मुहर्रम” (ज्या महिन्याच्या नावावरून ते पाळले जाते) म्हणून ओळखली जाणारी पवित्र सुट्टी पाळतात. हा उत्सव मोहरमच्या पहिल्या तारखेपासून सुरू होतो आणि दहा दिवस चालतो, मोहरमच्या दहाव्या दिवशी संपतो. इमाम हुसेन यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुस्लिम नेतृत्व स्वीकारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. शिया आणि सुन्नी मुस्लिम दोघेही मोहरम साजरे करतात. तथापि, ते प्रसंग त्याच पद्धतीने पाळत नाहीत. शिया लोकांसाठी, हा आनंदाचा नव्हे तर साजरा करण्याचा दिवस आहे आणि अशा प्रकारे, ते 10 दिवसांच्या कालावधीसाठी शोक करत आहेत.
संपूर्ण देशात मोहरम मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. चंद्र दर्शनानंतर दुसऱ्या -तिसऱ्या दिवशी ताजिया बनविण्यात येतो. हा ताजिया दोन दिवस मंडपात ठेवून आठव्या, नवव्या दिवशी मिरवणूक काढली जाते आणि दहाव्या दिवशी मिरवणुकीनंतर तो विसर्जित करण्यात येतो. मिरवणुकीला ढोल-ताशे, सनई ही वाद्ये असतात. हा ताजिया पूर्वी बांबूच्या काठ्यांपासून तयार करण्यात येत असे. आता साग लाकडाचा बनविण्यात येतो. रंगीत कागद वापरून त्याला सुशोभित करण्यात येते. त्यात काही ठिकाणी इमाम हसन- हुसेनचे पंजे ठेवण्यात येतात,तर काही ठिकाणी केवळ त्यांची नावे लिहली जातात. ताजिया मिरवणुकी दरम्यान पंजे नाचवले जातात. हे पंजे बऱ्याचदा धातूचे असतात. मिरवणुकी आधी त्यांचे पूजन केले जाते. (दाभोळमध्ये तांबडे मोहल्ला येथे दर्ग्यामध्ये 5 पंजे पूजले जातात.) हे पंजे प्राप्त होण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. दाभोळमधील लोक तेथील पंजे एका खेकड्याच्या पोटी सापडले सांगतात तर दापोलीत काही ठिकाणी ते समुद्रात संदूक पेटीतून वाहत आलेले सांगतात. काही ठिकाणी ताजिया मोहम्मद पैगंबरांच्या मजारची प्रतिकृती म्हणून मानण्यात येते. दापोलीत ताजिया मिरवणुकीत मुस्लिम लोकांबरोबर हिंदू लोकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. मुस्लिम समुदायातील काही लोक मोहरमचा संपूर्ण महिना उपवास करतात. हा उपवास अनिवार्य नाही; परंतु मोहरम महिना पवित्र म्हणून हा उपवास केला जातो.
मुहम्मदाच्या मृत्यूनंतर लगेचच काही वाद सुरू झाले होते. यात प्रामुख्याने, मुहम्मदाचा उत्तराधिकारी कोण? हा मुद्दा होता. काहींच्या मते, मुहम्मदाचा चुलत भाऊ आणि जावई, अली, हा त्याचा खरा उत्तराधिकारी होता. मुहम्मदाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू असतानाच, मदिनेतील काही प्रमुख मुस्लिम धुरीणांशी संगनमत करून अन्य काही मुसलमानांनी मुहम्मदाचा एक सासरा अबू बकर याला वारस म्हणून निवडले आणि त्याला खलिफा म्हणून घोषित करून टाकले. मुसलमानांची एकी टिकून राहावी म्हणून अली व अन्य कुटुंबियांनी अबू बकरच्या नियुक्तीला पाठिंबा दिला व रशिदून खिलाफतीची सुरूवात झाली. अबू बकर नंतर अजून दोन खलिफा झाले. पण बर्यापैकी अनागोंदी पसरली होती. अस्थैर्य माजले होते. खलिफाचा खून झाला. म्हणून, अलीला खलिफा केले गेले. पण त्याच्याविरूद्धही उठाव होत राहिले. सतत युद्धं होत राहिली. या यादवी युद्धाला ‘पहिला फितना’ म्हणतात. फितना म्हणजे, दुही. या सर्वा भानगडीत अलीची बाजू ज्यांनी घेतली ते शिया. अरबीत शिया म्हणजे ‘सामिल असलेले’. जे अलीला सामिल होते, ते शिया.
त्यानंतर अलीचा धाकटा मुलगा हुसेन हा उभा राहिला. इकडे मुआवियाही वारला आणि त्याने खिलाफत आपला मुलगा याझिद याच्या हाती सोपवली. शियांची अशी अपेक्षा होती की मुआवियानंतर खिलाफत अलीच्या वंशावळीत परत येईल. पण तसे झाले नाही व त्यामुळे हसन व त्याच्या साथीदारांनी याझिदच्या पायी निष्ठा वाहाण्यास नकार दिला. हुसेन आपल्या कुटुंबीय आणि साथीदारांना घेऊन मदिनेहून कुफा नामक गावी निघाला. रस्त्यात, करबला जवळ, याझिदच्या मोठ्या सैन्याने त्यांची वाट अडवून त्यांन घेरले. इथेच ती प्रसिद्ध आणि निर्णायक करबलाची लढाई झाली. तारीख होती, १० मुहर्रम. या लढाईत हुसेनचा पराभव झाला. त्याच्या साथीदारांची कत्तल झाली. अली असगर नामक त्याच्या सहा महिन्यांच्या मुलाचीसुद्धा हत्या केली गेली. या लढाईच्या वेळी हुसेनच्या सैन्याला पाण्यावाचून तडफडावे लागले. अतिशय हाल झाले.
या सर्व घटनाक्रमाबद्दल शोक व्यक्त करण्याकरता शिया आजही मातम मनवतात. आजच्या दिवशी शोक व्यक्त करणे, रडणे वगैरे कार्यक्रम सामुहीक पद्धतीने चालतात. त्यावेळी हुसेन व इतर शियांना झालेल्या जखमांप्रित्यर्थ आजचे शियाही स्वतःला जखमा करून घेतात. तलवारीने स्वतःला कापून घेतात. धारदार लोखंडी साखळ्यांनी स्वतःला (कडकलक्ष्मीसारखं) मारून घेतात. हा दिवस सणाचा नाही तर दु:खाचा आहे.
प्रविण बागडे ,नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com