उत्कट प्रेमाचे अतूट रेशीम बंध

0

रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडुन मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. शेवटी श्रध्दा खरी ठरली आणि इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. 

हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिने तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन त्यांनी तिला दिले. राखी बांधताना बहिणीने म्हणावे, “येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल” (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे)

श्रावणमास पर्व हे समाज जीवनाचे प्रतिबिंब आहे. रक्षाबंधन हे एक सामाजिक व धार्मिक पर्व आहे. हे पर्व सामाजिक परंपरेमध्ये सद्भाव, स्नेह, आत्मियता, बंधुभाव, कौटुंबिक एकात्मता यांचा प्रवाह निर्माण करणारे आहे. खऱ्या अर्थाने संस्कृतीला समृध्द बनविणारे, आध्यात्मिक स्पर्शाने जनमनाला पुलंकित करणारे पर्व आहे, रक्षाबंधन पर्व! राणी कर्णावतीने आपल्या रक्षणासाठी हुमायुँ राजाला भाऊ मानून बांधलेली राखी इतिहासाच्या पानावर कोरल्या गेली. हिंदू-मुस्लिम यांच्यामधील स्नेह व एकी निर्माण करणारी ही जीवंत साक्षच आहे. ‘स्त्री’ जातीच्या रक्षणासाठी धर्म, जाती, लिंग या भेदांना छेदून पुढे टाकलेले एक पाऊल आहे हे ! राष्ट्रीय एकात्मेला पोषक व वर्धक प्रसंग समाजात सद्भावना व सत्प्रवृत्तींचे पोषण करण्याचे कार्य करतात. आपल्या भाऊरायाला बहीण राखी बांधते व आपल्या रक्षणाची अप्रत्यक्षरीत्या हमी घेते. हिंदू संस्कृतीतील समाजमुल्यांचे पोषण करणारी ही सामाजिक परंपरा आजही मोठया दिमाखाने देशात सर्वत्र नांदतांना दिसत आहे.

उत्तर भारतातील ग्रामीण भागांत जिथे अनेक खेड्यांमध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे, तिथे मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात. त्यांचे भाऊ, जे विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात, कधीकधी त्यांच्या बहिणींच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात. अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यांपूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात. भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात. 

शहरी भारतात, जिथे कुटुंबे अधिकाधिक विभक्त होत आहेत, तिथे हा सण अधिक प्रतीकात्मक बनला असला तरीही तो खूप लोकप्रिय आहे. या उत्सवाशी संबंधित विधी त्यांच्या पारंपारिक प्रदेशांच्या पलीकडे पसरले आहेत. तंत्रज्ञान, स्थलांतर, चित्रपट, सामाजिक संवाद, आणि हिंदू धर्माच्या राजकीय प्रचाराद्वारे या सणाचे स्वरूप बदलले जात आहे. रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधांची एक बदललेली परंपरा देखील आहे. यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे, तसेच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हणले आहे. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.                                                                        

                                                                                                                                                                                                                              हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पोर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हणले आहे. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून “भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो” अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.

                                                                                                                                                                                                                   जैन परंपरेमध्ये सातशे मुनींवर दृष्ट प्रवृत्तीने केलेल्या उपसर्गाला दुर करण्याचे कार्य या पर्वमध्ये झाले. जैन लोक रक्षाबंधनाच्या दिवशी जैन मंदिरात जाऊन अभिषेक-पूजन करुन मुनीं प्रती हृदयभाव ठेवून पंडित-पुजाऱ्यांच्या हस्ते राखी बांधून हे पर्व साजरे करतात. धर्मरक्षणाचे चकं कण आहे ते ! प्रथम धार्मीक व नंतर सामाजिक दायित्व पार पाडले जाते. हे पर्वधर्म व धर्मावलय यांच्येशी मातृत्व भावनेतून जोडणारे आहे. संस्कृती व धर्म समर्पणाच्या भावनेला वृध्दिगत करणारे आहे. श्रमण संस्कृतिमध्ये रक्षाबंधनाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. ईश्वरप्रती समर्पणाची भावना व संस्कृतिचा अत्यंत आदरया भावनांना श्रेष्ठस्थान दिले गेले आहे. सामाजिक दृष्टिकोनातून रक्षाबंधन हे वात्सल्य व बंधुभावाचे परिपाक पर्व आहे. बंधुभाव व स्नेहवर्धनाचे पाठया पर्वामुळे गिरविले जातात. समाज व धर्म या पेक्षाश्रेष्ठ आहे राष्ट्रधर्म ! म्हणून सामाजिक व धार्मीक अस्तित्व टिकविण्याची आज राष्ट्राचे अस्तित्व टिकविण्याची, त्याचे जतन करण्याची गरजभासत आहे. ही महान जबाबदारी आज आपणांवर आहे. ती नेटाने करणे गरजेचे आहे, त्यामुळेही घडी नीट घट्ट बसेल.

                                                                                                                                                                                                                     आलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या प्रधानाने कट आखून बादशहाचा खून केला व प्रेत नदीत टाकून दिले. एका स्त्रिने ते पाहिले. प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने प्रेत पाण्याबाहेर काढले आणि प्रेताचा वाली येईपर्यंत प्रेताजवळ बसून राहिली. बऱ्याच वेळानंतर बादशहाच्या शोधात सैनिक तेथे आले. बादशहाचा मुलगा शहाआलम याने त्या हिंदू स्त्रीचे आभार मानले. तिला आपली बहीण मानले. ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शहाआलमला राखी बांधू लागली. ही प्रथा पुढे अकबरशहा व बहादूरशहा यांनीही चालू ठेवली. इतिहासात याचा उल्लेख आहे. मुघल बादशहानी पवित्र मानलेला हिंदूंचा हा एकमेव सण आहे.

                                                                                                                                                                                                                      या श्रावण पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती (नऊ धाग्यांची जुडी) करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात. रक्षाबंधनाच्या निमीत्ताने पर्यावरणाचे रक्षण, ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा आणि स्त्रीभृणहत्या रोखण्याचा संदेश राखीच्या माध्यमातून करण्याचा निर्धार भाऊ-बहिण आणि समस्त भारतीयांनी या नाजुक पर्वावर केला पाहिजे. 

——————————————–

प्रविण बागडे ; नागपूर , भ्रमणध्वनी : 9923620919

ई-मेल : pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here