उद्योग गेले तिकडे
रे कुणाचे हे उद्योग
दर वेळी असे कसे
दिसे असे योगायोग…
करा अचूक निदान
कुठला जडला रोग
म्हणू नकात केवळ
हे नशीबाचेचं भोग…
टिका करणे जमते
शस्त्र एवढे अमोघ
वाहतोयं दुसरीकडे
योजनांचा हा ओघ…
भली चांगली शक्ती
कोण करे दुरुपयोग
का घडते असे कसे
नेमा एखाद आयोग…
संधी येतीलं पुन्हा रे
बोलून काय उपयोग
शांतचित्ते बसून रहा
करत अभ्यास योग…
तोंडात घालती बोटे
रे सर्व सामान्य लोग
एक व्हावे आतातरी
थांबवावे निरूद्योग…
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996