गड्डा जत्रा ..
सोलापुराची परंपरा
रे अद्भुत गड्डा जत्रा
संक्रांतीच्या निमित्ते
सिध्देश्वराची यात्रा
आबालवृद्धां आवडे
दुकाने भरती सतरा
मंतरलेले दिवस ते
चक्कर मारू मित्रा
पंचक्रोशीत उत्साह
बदलून टाकी चित्रा
रोमांचक एसेल वर्ड
शहारेलं गात्रा गात्रा
तळ्यातले सिध्देश्वर
रोषणाई भुलवे नेत्रा
प्रतिबिंब उत्सवाचे
आठवे तया चरित्रा
बहुविध जाती धर्मं
जमतात एका छत्रा
राव रंक लहानथोर
गुंफतात एका सूत्रा
यंदा मात्र हिरमोड
कोरोनाचा बे खत्रा
कृपा करा सिद्धेश्वरा
सुचवावी भलीमात्रा
जगभरी फिरे जरी
इथे यावे वाटे मित्रा
सोलापूरी नाळजुळे
खुणावते गड्डा यात्रा
गड्डायात्रा ..
संक्रांतीले सोलापुरी
नीत गड्डायात्रा भरते
आबालवृद्ध खुशीत
आनंद उत्साह भरते
तळ्यांतले सिध्देश्वर
रे जीवा शिवाचे नाते
सरोवरातले प्रतिबिंब
आशीष सकला देते
किती विविध दुकाने
मागालं ते ते मिळते
खाद्यपेयांचे स्टाॅल ते
पाऊल तिकडे वळते
रोमांचक एस्सेलवर्ड
बालचमूंना आवडते
दमल्यावरती रसपान
ठिकाण असे निवडते
प्रेमीयुगुला फिरायला
गणित सहज जुळते
टवाळखोरांस दंडूका
भाषा चांगली कळते
वरिष्ठ नागरिक फिरे
आठवणी बे जागवते
आधीजत्रा अशीहोती
तहान अपुरी भागवते
जगभरी हिंडलो जरी
गड्डायात्रा बे लुभावते
सोलापूरी अतूट नाळ
सतत हसत बोलावते
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996..