झाकीरहुसेन निधने
स्थिरावे गोड निनाद
आबालवृध्द कर्णास
लावला सुरांचा नाद…
उस्फुर्त करे शब्दांस
अनाडीही देतो दाद
सवयलावली अधरा
बोलती वाह उस्ताद…
शास्त्रोक्तपाश्चात्यसूर
फ्युजन ते मन मुराद
शालीनता व्यक्तीत्वां
पूरी करे रसिकमुराद…
बांधता गिता स्वरांत
विहार करती आझाद
कैक अ विस्मरणीय
कलाकृती येती याद…
दिग्गजसहनवोदिता
दिला साथ आस्वाद
बोटांत अद्भुत जादू
नाविन्या कुठे ददाद…
कैक वाद्य्या लीलया
सहजसाधती संवाद
असा दुजा होणे नसे
नोंद भिन्न निर्विवाद …
हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996…