आर्थिक लोकशाही
बाबा खंदे पुरस्कर्ते
बंधुत्वभाव प्रियतम
समता स्वातंत्र्य नाते…
डबलडाॅक्टरेट प्राप्त
पहिले भारतीय होते
विषय असो कुठला
अस्खलित सूज्ञ वक्ते…
अर्थशास्त्रा व्यासंगी
बहुल सुशिक्षीत नेते
अर्थशास्त्र किचकट
सुलभ श्रवणीय श्रोते…
निळी शाई प्रभावंत
लेखणी सरार चालते
जितका गहन विषय
तितुके होती बोलते…
रिझर्व्ह बँक स्थापना
तिथेच कर्तृत्व दिसते
वैचारिक गुलामी नसे
सकल नेतृत्व कळते…
रूपयाचा प्रश्न प्रबंध
रे मांडली सुस्पष्ट मते
परखड विचार मंथन
कधी ना घेतले नमते…
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996