तैलाभिषेक   ..मिरवणूक ..

0

तैलाभिषेक   ..

तैलाभिषेक करूया

अडुसष्ठ ज्योतिर्लिंग

सण येता संक्रांतीचा

अंतरी आगळी झिंग

काठ्यांचे सोहळ्यात

सोलापुरी सगळे दंग

सेवेकरी  शिस्त बद्ध 

कपड्यांचा शुभ्र  रंग

राजहंसांचे जथे जणूं

धवल  नवल  अथांग

मिरवणूकीत सामील

कसे  फेडायचे   पांग

जात  पात  रंक  राव

कुठले ना  दिसे व्यंग

हर्र हर्रचे  जयघोषात

भरूनि  जाय अंतरंग

डोळ्यांचे फिटे पारणे

विवाहाचा  तो  प्रसंग

अवर्णनीय सोहळा रे

अपुरा  शब्द  व्यासंग

आतषबाजी रोषणाई 

पाहणारे  होतात  गुंग

जय हो सिध्दरामेश्वरा

मनात  वाजतो  मृदंग 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६..

www.kavyakusum.com

2

मिरवणूक ..

हबूकाठी मिरवणूक 

भव्य  दिव्य सोहळा 

सोलापुरी  भूषण तो

दिमाख तयाआगळा

ताजा  मागे इतिहास  

आनंदकधी न शिळा

एकदा व्हावे सामील

लागेलं  त्याचा  लळा

पांढ-या शुभ्र वस्त्रात

सेवेकरी दिसे बगळा

दुधाचा सागर वाहता

प्रेक्षणीय असे वेगळा

जाणूनि घ्यावी  कथा

नीर  डोळ्यां घळाळा

हर्र  हर्रच्या जयघोषां

उत्सव चाले खळाळा

सिध्द रामेश्वर विवाहां

परिवार  दाटे  सगळा

जो जो होईलं सामीलं

आशीष मिळे सकळां

संक्रांतकिंक्रात संपन्न 

देता  घेता  तिळगुळा

शिवातव भक्त भोळा

भावा बुडे  होई खुळा

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६..

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here