आचार्यांचा जन्मदिन
साजरा हो दर्पण दिन
निर्मीले पहिले वृतपत्र
करायं समाजप्रबोधन…..
कसा असावा पत्रकार
आदर्श दिधला घालून
बाळशास्त्री जांभेकर
घ्यावे खरेचं समजून….
अनेक भाषेत नैपुण्य
फ्रेंचराजा करे सन्मान
परदेशी भाषा जाणती
मराठीतरी आईसमान….
शिला लेख ताम्र पट
करी सखोल संशोधन
अभिनव कल्पनेमधून
करी जनता प्रबोधन…
विविध विषयी लेखन
चालले विचार मंथन
द्रष्टे समाज सेवक ते
साधले लोक शिक्षण ….
समस्यावर हवी चर्चा
नेटिव्ह संस्था स्थापन
सकल कार्य ते हातून
रूढी परंपरा परिवर्तन…
मासीक पहिले चालू
नाम त्यांचे ‘दर्पण ‘
लावली वाचन गोडी
ग्रंथालय एक स्थापून …
आयुष्य चौतीसवर्षाचे
कर्म मोठे शतकाहून
अशा कर्मयोग्या नमन
करी शब्दांजली वाहून….
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996