दिनविशेष / राशिभविष्य

0

शके १९४५, शोभननाम संवत्सर, शुक्रवार, दि. १६ जून २०२३, ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी, चंद्र- वृषभ राशीत,  नक्षत्र- कृत्तिका दुपारी ३ वा. ०७ मि. पर्यंत नंतर रोहिणी, सुर्योदय- सकाळी ६ वा. ०३ मि. , सुर्यास्त-   सायं. १९ वा. १६ मि. 

नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज बुध – चंद्र युतीयोग, शुक्र – चंद्र लाभयोग व शनि – चंद्र केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, तुला व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.

        दैनंदिन राशिभविष्य

मेष : व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

मिथुन : कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. निरुत्साही रहाल. महत्त्वाची कामे आज नकोत. कौटुंबिक जीवनात मनस्ताप संभवतो.

कर्क : आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. कला व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला जाणार आहे.

सिंह : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आज आनंदी व आशावादी रहाल.

कन्या : प्रवासाचे योग येतील. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहू शकाल.

तुळ : मनाविरुद्ध घटना घडेल. मानसिक ताणतणाव राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक जीवनात वादविवाद टाळावेत. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. कामाचा ताण जाणवेल.

धनु  : अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. मनस्ताप संभवतो. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मकर : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. बौद्धिक क्षेत्रात क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील.

कुंभ  : नोकरी, व्यवसायात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टी, गुंतवणुकीस अनुकूलता लाभेल. सार्वजनिक कामात प्र्रतिष्ठा लाभेल.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. काहींना नवा मार्ग दिसेल. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास दिवस अनुकूल आहे. मनोबल वाढेल.

आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here